देव तारी त्याला कोण मारी...!
✒️ *देव तारी त्याला कोण....!*✒️ संजय कदम मंगळवार 5 सप्टेंबर 1996 चा दिवस होता. शिक्षक दिन मात्र गोपाळकाला असल्याने शाळेला सुट्टी होती. मी मविप्र समाज, नाशिक संस्थेच्या नूतन जवाहर विद्यालय, मनेगाव ता. सिन्नर जि नाशिक येथे उपशिक्षक पदावर कार्यरत होतो. माझ्या दृष्टीने सुट्टी असूनही अडचणीची होती. कारण बाहेर कुठे जायचे तर खर्च होणार स्वतःचे प्रवासाचे सायकल सह कोणतेही साधन नव्हते. मात्र अनुदानित विद्यालयात नोकरी सुरु होऊन दोन वर्षे नोकरी झाली होती तरी माध्यमिक शिक्षणाधिकारी, नाशिक यांची मान्यता अर्थात ऍप्रूअल नव्हते. आम्ही बेताच्या आर्थिक परिस्थितीत ही खाऊन-पिऊन सुखी...